नैसर्गिक आपत्ती
1.अतिवृष्टीमुळे महापूर ,भीषण दुष्काळ
2.उन्हाळ्यातील 45℃ पर्यंत पोहचलेलं तापमान
मानवनिर्मित आपत्ती
1.अन्नभेसळ व औषधभेसळ,
2.वाहनांच्यामुळं वाढतं प्रदूषण आणि कारखान्यामुळं निघणारा घातक धूर, असं प्रदूषणाचे भयानक सावट जगावर घोंगावत आहे
3.अतोनात होणारी जंगलतोड
4.नद्या -नाले भरून टाकणारा प्लास्टिक कचरा
5.आधुनिक जीवनशैली मुळे फास्टफूड चा विळख्यात जग अडकत चालले आहे त्यामुळे शरीर आणि मन आजारी पडत आहे.
यासाठी आपणाकडे अजूनही यात बदल घडवण्यासाठी एक संधी आहे.
● जर आपण एक झाड लावलं तर पुढील पिढीला प्राणवायुची हमी मिळेल
● प्लास्टिक चा वापर कमी केला तर नद्या नाले पुन्हा स्वच्छ वाहतील
● जर शुद्ध अन्नाचा आग्रह धरला तर आरोग्याची हमी मिळेल
● जर गाडी पेक्षा प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक वापर वाढवला तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल
निसर्ग वाचवण्याची जबाबदारी कोण्या एका संस्थेची अथवा फक्त सरकारची नाही किंवा फक्त पर्यावरण प्रेमींच काम नाही
तर प्रत्येकाची जबाबदारी आहे.
आपल्या छोट्या छोट्या कृतीतून मोठा फरक पडू शकतो
चला तर मग
आजच नवा संकल्प करूया
● झाडे लावण्याचा आणि जपण्याचा
● पाणी वीज,इंधन वाचवण्याचा
● रसायनांऐवजी नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा
चला एक पाऊल निसर्ग संवर्धन कडे टाकू या…