vasundra

विज्ञान व पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सुमारे 33% भाग (म्हणजे एक-तृतीयांश) जंगल किंवा वृक्षाच्छादित क्षेत्राखाली असणे आदर्श मानले जाते.

यामुळे हवामान संतुलित राहते, कार्बन डाय-ऑक्साइड शोषले जाते,
पर्जन्यमान योग्य राहते,मृदा धूप आणि आपत्ती कमी होतात.भारत सरकारनेही हेच लक्ष्य ठेवलं आहे – 33% भूप्रदेश वनक्षेत्राखाली आणणे.पण दररोज वाढणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइडच्या प्रमाणामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे आता वेळ आली आहे ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांच्यात समतोल राखण्यासाठी हे प्रमाण 33% वरून वाढवून 45 ते 50 टक्के पर्यंत घेऊन जाण्याची गरज आहे.

असे झाल्यास हवामान संतुलित राहील, पर्जन्य योग्य पडेल आणि पुढील पिढीसाठी हिरवी निसर्ग संपन्न निरोगी पृथ्वी घडेल.

 

चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया.

विश्व, भारत आणि महाराष्ट्रातील सध्याचे जंगल-आवरण

जागतिक

पृथ्वीच्या जमिनीपैकी सुमारे 31% भाग जंगलांनी आच्छादित आहे. अंदाजे 4.06 अब्ज हेक्टर जंगल क्षेत्र आहे.

भारत

भारतामध्ये सध्या जंगल + वृक्ष आवरण = 25.17% आहे. त्यापैकी खरं “जंगल आवरण” = 21.76%, आणि “वृक्ष आवरण” (मुख्य जंगल क्षेत्र) = 3.41%.

महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये सध्या जंगल आवरण = 16.5% आहे. राष्ट्रीय वन धोरणानुसार लक्ष्य 33% आहे. म्हणजे अजून सुमारे 16.5% झाडांची गरज आहे. पण सध्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण पाहता ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड प्रमाण बरोबर ठेवायचे असेल तर वृक्ष लागवड 45 ते 50 टक्के पाहिजे

चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया.

आधुनिक काळातील लागवडीचे प्रकार 🌱

आजच्या धावपळीच्या काळात झाडं लावणं ही फक्त एक जबाबदारी नाही, तर एक आनंददायी अनुभव आहे. आधुनिक पद्धतींनी आपण झाडं लावणं सोपं आणि टिकाऊ बनवू शकतो. चला तर मग बघूया काही लोकप्रिय लागवडीच्या पद्धती —

  1. पारंपरिक लागवड (Traditional Plantation)
    ही सगळ्यात जुनी पद्धत आहे. म्हणजे सरळ खड्डा खणून त्यात रोप लावणं. गावाकडं अजूनही हीच पद्धत वापरली जाते. साधी, सोपी आणि नैसर्गिक.

  2. कंटेनर लागवड (Container Planting)
    जर जागा कमी असेल, जसं की फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना, तर कुंड्यांमध्ये झाडं लावणं ही उत्तम पद्धत आहे. यात रोपं सहज हलवता येतात आणि घराला हिरवळ मिळते.

  3. ऊर्ध्व लागवड (Vertical Plantation)
    शहरात भिंती रिकाम्या दिसतात, पण त्या हिरव्यागार करू शकतो. भिंतींवर किंवा विशेष स्ट्रक्चरवर लावलेली झाडं म्हणजे vertical plantation. सुंदरही दिसतं आणि हवा शुद्ध ठेवतं.

  4. मियावाकी लागवड (Miyawaki Plantation)
    ही एकदम भन्नाट पद्धत आहे. यात कमी जागेत भरपूर झाडं लावली जातात आणि जंगलासारखं दाट हिरव जंगल तयार होतं. शहरांमध्ये ही पद्धत झपाट्याने लोकप्रिय होतेय.

  5. हायड्रोपोनिक लागवड (Hydroponic Plantation)
    यात मातीची गरजच नाही. फक्त पाण्यात आणि पोषण द्रावणात झाडं वाढतात. आजकाल भाज्या, पालेभाज्या उगवण्यासाठी ही पद्धत फार प्रसिद्ध आहे.

"धरती ही आई, निसर्ग आपली श्वास-रेखा, समृद्धी म्हणजे केवळ धन नव्हे – तर मनाची, समाजाची आणि पर्यावरणाचीही प्रगती."

धरतीसाठी

मानवतेसाठी

भविष्यासाठी

धरतीसाठी

मानवतेसाठी

भविष्यासाठी

आपले आवाहन 🌿

हे कार्य फक्त आमचं नाही, हे आपल्या सर्वांचं आहे.
लहानसं पाऊलही मोठा बदल घडवू शकतं.

“एक झाड लावलं, तर हजार श्वास वाचतात,
एक हात समाजासाठी दिला, तर हजार स्वप्नं फुलतात.”

"धरतीची रक्षा, माणसाची प्रगती, आणि समाजाची समृद्धी."

WhatsApp Image 2025-09-09 at 15.47.58_8fded621

आपले स्वप्न

आजचा दिवस हा एका सुंदर प्रवासाची सुरुवात आहे.
तो सोपा नसेल, पण नक्कीच अर्थपूर्ण असेल.

“एक पाऊल निसर्गासाठी,
एक हात समाजासाठी,
आणि एक स्वप्न – उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी.”

WhatsApp Image 2025-09-09 at 15.47.58_8fded621

"झाडांमध्ये सावली, पाण्यात जीवन, प्रेमात समाज, आणि आशेत भविष्य दडलेलं आहे. वसुंधरा समृद्धी म्हणजे – मानव आणि निसर्ग यांचं नातं पुन्हा जोडलेलं आहे."

"हरवलेली हिरवळ… पुन्हा जिवंत करू या"

कधी काळी पृथ्वी हिरवीगार होती,
जंगले आपले श्वास बनली होती,
आणि प्रत्येक वाऱ्यात निसर्गाची सुगंधी झुळूक वाहत होती.

आज फक्त आठवणी आणि काही अवशेष उरले आहेत…
मानवाच्या प्रगतीसोबत निसर्ग मागे पडला,
जंगले हळूहळू नाहीशी झाली.

पण अजूनही उशीर झालेला नाही… आम्ही हरवलेली ती हिरवळ पुन्हा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

या प्रवासाचा भाग बना पृथ्वीला तिचं हरवलेलं सौंदर्य परत देण्यासाठी.

चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया.

आपल्या हातातलं हवामानाचं भवितव्य

पूर्वी

आनंददायी, सुखद आणि निसर्गाशी जुळलेलं.

नंतर

असह्य, त्रासदायक आणि आपलं जीवन धोक्यात टाकणारं.

आपले ध्येय

भरपूर झाडं लावून पृथ्वीचं तापमान पुन्हा थंड, निरोगी आणि जीवनदायी करायचं.

महाराष्ट्राचं हवामान बदलतंय, आपण बदल घडवूया

वनक्षेत्राचा आढावा

या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात वनसंवर्धन आहे.

या जिल्ह्यांमध्ये फक्त 1% पेक्षा कमी वनक्षेत्र आहे.

गडचिरोली (68.81%), सिंधुदुर्ग (54.31%), रत्नागिरी (51.31%) आणि रायगड (41.10%)

लातूर, सोलापूर, जालना, परभणी आणि उस्मानाबाद

वनक्षेत्राचा आढावा

या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात वनसंवर्धन आहे.

गडचिरोली (68.81%), सिंधुदुर्ग (54.31%), रत्नागिरी (51.31%) आणि रायगड (41.10%)

या जिल्ह्यांमध्ये फक्त 1% पेक्षा कमी वनक्षेत्र आहे.

लातूर, सोलापूर, जालना, परभणी आणि उस्मानाबाद

महाराष्ट्रामध्ये 2019 च्या अंदाजांनुसार, एकूण जंगल क्षेत्र 50,778 ते 50,646 वर्ग कि.मी. आहे, जे राज्याच्या भौगोलिक क्षेत्राचा अंदाजे 16.5% भाग आहे .

 

वृक्षारोपण आणि राबवण्यात आलेली मोहीम

धाराशिव (छत्रपती संभाजीनगर)  जिल्ह्यात 19 जुलै 2025 रोजी “एक पेड़ माँ के नाम’” मोहिमेत एका दैनंदिनात 115 लाख वृक्ष लागवड केली असून त्या मध्ये 57 हेक्टर क्षेत्र वापरून 50 स्थानिक जातींचे वृक्ष रोपले गेले; प्रत्येक रोपणास QR कोडद्वारे ट्रॅक केले गेले .

लक्ष्य आणि वस्तुस्थिती

महाराष्ट्राचे स्वप्न आहे की, राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३% भागावर वनक्षेत्र असावे. पण सध्याची वस्तुस्थिती अशी आहे की, वनक्षेत्र फक्त २०.१४% आहे.

वनक्षेत्राचे विभाजन

अति घनदाट जंगल (Very Dense Forest): 17.2% मध्यम घनदाट जंगल (Moderately Dense Forest): 40.5% खुले जंगल (Open Forest): 42.3% ही आकडेवारी सांगते की महाराष्ट्रातील वनसंपदा अजूनही अस्तित्वात आहे, पण ती लक्ष्यापेक्षा खूपच कमी आहे. अजूनही आपल्याला झाडे लावून ही दरी भरून काढावी लागेल.

⚠ चेतावणी

आज तापमान 46 अंश झाले आहे; उद्या 50 अंश व्हायला वेळ लागणार नाही. त्या वेळी माणूस, प्राणी, पक्षी कोणताही सजीव जगू शकणार नाही.

🙌 आवाहन

🌿 अजूनही वेळ गेलेली नाही! आजच झाडे लावा कारण झाड म्हणजे सावली, प्राणवायू आणि जीवन!

🌱 निसर्ग वाचवा, भविष्य घडवा!

पर्यावरणपूरक जीवन जगा, भौतिक मोह कमी करा माणुसकी आणि मानवजातीचं रक्षण करा!