वसुंधरा ही पूर्वजांची देणगी नव्हे, ती उद्याच्या पिढ्यांचा हक्क आहे. तिला हिरवीगार, समृद्ध आणि शाश्वत ठेवणं हेच आपलं कर्तव्य आहे. निसर्गाचं जतन करू, संपन्नता वाढवू आणि चला तर सजीव सृष्टीचे तसेच मानवजातीचे रक्षण करूया
“चांगले कार्य… कौतुकाशिवायही प्रेरणा देते.”
आजच्या वेगवान जगात निसर्गाचे महत्त्व आपण विसरत चाललो आहोत. झाडे तोडली जात आहेत, हवा प्रदूषित होत आहे आणि हवामान बदलाचे संकट आपल्या दारात उभे आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक रोप लावणे हे फक्त कर्तव्य नाही, तर भविष्यासाठी दिलेला जीवनदायी श्वास आहे.
"एक रोप, लाखो आशा"
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे ध्येय एकच आहे निसर्गाचे रक्षण आणि पुनर्स्थापना. आम्ही मानतो की झाडे हीच खरी संपत्ती आहेत. प्रत्येक झाड पृथ्वीला सावली, शुद्ध हवा आणि जीवनाचे अमृत देते. त्यामुळे झाडे लावणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवन देणे.
"झाडे हीच खरी संपत्ती, निसर्ग हीच खरी समृद्धी"
आम्ही हे कार्य करतो कारण आम्हाला ठाऊक आहे की लहानशी कृतीही मोठा बदल घडवू शकते. आज लावलेले एक छोटेसे रोप उद्या संपूर्ण गावाला प्राणवायू देईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले, तर एक नवीन हरित क्रांती घडेल.
कृती प्रथम
बोलण्यापेक्षा कृतीतून बदल घडवतो..
पारदर्शकता
काम, खर्च आणि परिणाम — सर्व स्पष्टपणे मांडतो.
समुदाय सहभाग
स्थानिक लोकांसोबत हातात हात घालून काम करतो.
भारताची एकूण लोकसंख्या 1.4 अब्ज असून प्रति व्यक्ती फक्त 28 झाडे येतात...
हेच इतर देशात बघायला गेले तर त्याची आकडेवारी खालील प्रमाणे दिसून येते
ऑस्ट्रेलिया
0
अमेरिका
0
चीन
0
युनायटेड किंगडम
0
भारत
0
छोटे काम, मोठे बदल.
एक चांगले कार्य… सामाजिक बदलासाठी आमची वचनबद्धता
एक रोप, लाखो आशा.
आम्ही हे कार्य का करतो ?
आजच्या वेगवान जगात निसर्गाचे महत्त्व आपण विसरत चाललो आहोत. झाडे तोडली जात आहेत, हवा प्रदूषित होत आहे आणि हवामान बदलाचे संकट आपल्या दारात उभे आहे. अशा परिस्थितीत, प्रत्येक रोप लावणे हे फक्त कर्तव्य नाही, तर भविष्यासाठी दिलेला जीवनदायी श्वास आहे.
"एक रोप, लाखो आशा"
वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे ध्येय एकच आहे – निसर्गाचे रक्षण आणि पुनरुत्थान. आम्ही मानतो की झाडे हीच खरी संपत्ती आहेत. प्रत्येक झाड पृथ्वीला सावली, शुद्ध हवा आणि जीवनाचे अमृत देते. त्यामुळे झाडे लावणे म्हणजे भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवन देणे.
"झाडे हीच खरी संपत्ती, निसर्ग हीच खरी समृद्धी"
आम्ही हे कार्य करतो कारण आम्हाला ठाऊक आहे की लहानशी कृतीही मोठा बदल घडवू शकते. आज लावलेले एक छोटेसे रोप उद्या संपूर्ण गावाला प्राणवायू देईल. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावले, तर एक नवीन हरित क्रांती घडेल.
“चांगले कार्य… कौतुकाशिवायही प्रेरणा देते.”
आजची परिस्थिती
आज आपण पर्यावरण नष्ट करण्याच्या अशा एका टप्प्यावर उभे आहोत, मानवाकडून निसर्गावर अतिप्रंचड अन्याय सुरू असण्याचे परिणाम म्हणून की काय
नैसर्गिक आपत्ती
1.अतिवृष्टीमुळे महापूर ,भीषण दुष्काळ
2.उन्हाळ्यातील 45℃ पर्यंत पोहचलेलं तापमान
मानवनिर्मित आपत्ती
1.अन्नभेसळ व औषधभेसळ,
2.वाहनांच्यामुळं वाढतं प्रदूषण आणि कारखान्यामुळं निघणारा घातक धूर, असं प्रदूषणाचे भयानक सावट जगावर घोंगावत आहे
3.अतोनात होणारी जंगलतोड
4.नद्या -नाले भरून टाकणारा प्लास्टिक कचरा
5.आधुनिक जीवनशैली मुळे फास्टफूड चा विळख्यात जग अडकत चालले आहे त्यामुळे शरीर आणि मन आजारी पडत आहे.
यासाठी आपणाकडे अजूनही यात बदल घडवण्यासाठी एक संधी आहे.
● जर आपण एक झाड लावलं तर पुढील पिढीला प्राणवायुची हमी मिळेल
● प्लास्टिक चा वापर कमी केला तर नद्या नाले पुन्हा स्वच्छ वाहतील
● जर शुद्ध अन्नाचा आग्रह धरला तर आरोग्याची हमी मिळेल
● जर गाडी पेक्षा प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक वापर वाढवला तर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल
निसर्ग वाचवण्याची जबाबदारी कोण्या एका संस्थेची अथवा फक्त सरकारची नाही किंवा फक्त पर्यावरण प्रेमींच काम नाही
तर प्रत्येकाची जबाबदारी आहे.
आपल्या छोट्या छोट्या कृतीतून मोठा फरक पडू शकतो
चला तर मग
आजच नवा संकल्प करूया
● झाडे लावण्याचा आणि जपण्याचा● पाणी वीज,इंधन वाचवण्याचा● रसायनांऐवजी नैसर्गिक उपायांना प्राधान्य देण्याचा
चला एक पाऊल निसर्ग संवर्धन कडे टाकू या…
जागतिक जंगलामधील जवळ पास 54% हिस्सा हा फक्त 5 च देशांमध्ये आहे
रशिया
0%
ब्राझील
0%
कॅनडा
0%
अमेरिका
0%
चीन
0%
जागतिक जंगलातील हिस्सा मध्ये भारत ह्या मध्ये 8 व्या स्थान वर आहे.
भारत
0%
महाराष्ट्रातील वनक्षेत्र
0%
आवश्यक असलेले वनक्षेत्र
0%
पण सध्या कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढलेले प्रमाण पाहता ऑक्सिजन आणि कार्बन डाय-ऑक्साइड प्रमाण बरोबर ठेवायचे असेल तर वृक्ष लागवड 45 ते 50 टक्के पाहिजे
महाराष्ट्रातील वृक्षलागवड आणि प्रदूषण (मागील ३ वर्षे)
सध्याची अडचण
महाराष्ट्रातील जवळपास ९८% लोक अजूनही असुरक्षित हवे मध्ये श्वास घेत आहेत
हिवाळ्यात प्रदूषण जास्त होते कारण धूर-धूळ अडकून बसते.
किती झाडे लागतील?
१ मोठं झाड दरवर्षी साधारण २२ किलो कार्बन डायऑक्साइड शोषून घेतं.
सध्याचं प्रदूषण कमी करायला महाराष्ट्राला कोट्यवधी झाडे लागतील.
फक्त झाडं लावणं पुरेसं नाही, तर ती जिवंत राहिली पाहिजेत.
विशेष लक्ष शहरी भागांवर (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक) द्यायला हवं.
पुढे काय करायचं?
पुढील काही वर्षांत ५०–१०० कोटी झाडे लावण्याचा उद्देश.
स्थानिक जातीची झाडे लावावीत (नीम, पिंपळ, वड, जांभूळ).
शहरांमध्ये ग्रीन बेल्ट, रस्त्यांच्या कडेने, शाळा-उद्योग परिसरात वृक्षलागवड.
झाडांबरोबरच वाहनांचा धूर, बांधकामातील धूळ आणि कारखान्यांचा धूर कमी करणेही गरजेचे.
आम्ही विदेशी झाडाला स्वदेशी झाडांचा पर्याय देतो
भारतामधील अलीकडील पुराचे कारणे (आधुनिक भाषेत)
जोरदार पावसामुळे नद्या ओवरफ्लो झाल्या.
जंगलतोड आणि शहरातील वाढलेल्या बांधकामामुळे पाणी जमिनीत शोषलं जात नाही.
शहरातील प्लास्टिक व कचरा नाल्यांमध्ये अडकतो.
डॅममधलं पाणी वेळेवर सोडलं नाही.
हवामान बदलामुळे पावसाचं वेळापत्रक विस्कळीत झालं.
झाडे लावल्याने पूर कसे टाळता येतील
झाडे पावसाचे पाणी मातीमध्ये शोषून घेतात.
मुळांमुळे माती घट्ट राहते, धूप थांबतो.
जंगल पाण्याचा वेग कमी करतात.
नदीत गाळ कमी होतो.
नदीकाठ मजबूत राहतो.
चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया...
आत्ता
नंतर
नंतर
झाडे न लावल्यास होणाऱ्या ३ मोठ्या समस्या
ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम. – पृथ्वीचे तापमान वाढल्याने हिमनग वितळतात, समुद्राची पातळी वाढते व किनारी भाग धोक्यात येतात.
वाढते प्रदूषण व हवामान बदल – हवा, पाणी व माती दूषित होऊन श्वसनाचे व इतर रोग वाढतात.तापमान वाढ, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ व पूर यांचा धोका जास्त होतो.
जैवविविधता नष्ट होते – पक्षी, प्राणी व कीटकांचे नैसर्गिक अधिवास संपून परिसंस्था असंतुलित होते.
म्हणजेच कालांतराने पृथ्वीवरी जीवसृष्टी चे अस्तित्व धोक्यात आहे
चला तर मग आपण सर्व जण मिळून वसुंधरा समृद्धी फाउंडेशन साथ देऊया, झाडे लावून निसर्ग जपूया, भविष्य घडवूया...