vasundra

आपल्या उपक्रमांबद्दल

वृक्षारोपण मोहिमा

शाश्वत शेती प्रकल्प

महिलांसाठी कौशल्यविकास कार्यशाळा

विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण-जागरुकता उपक्रम

क्रीडा, संस्कृती व युवक सक्षमीकरण

शिक्षण, आरोग्य, सामाजिक कल्याण, महिला व बालकल्याण

वृद्धाश्रम

हरित वसुंधरेसाठी आपले उपक्रम

वसुंधरा समृद्धी फाउंडेशनचे उपक्रम हे फक्त झाडे लावण्यापुरते मर्यादित नाहीत, तर निसर्गाशी नाते जपण्याचा एक संकल्प आहेत. आम्ही गावोगावी जाऊन वृक्षलागवड मोहिमा राबवतो, शालेय मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावतो आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रम करतो.

  1. पर्यावरण :- वृक्षारोपण, जलसंधारण, प्रदूषण नियंत्रण व स्वच्छता मोहीमा.

  2. सामाजिक कल्याण :- गरीब, अनाथ, वृद्ध व वंचित घटकांना आधार व सहाय्य.

  3. शिक्षण :- शैक्षणिक साहित्य, शिष्यवृत्ती, मार्गदर्शन व कौशल्यविकास.

  4. आरोग्य :- आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान, स्वच्छता व जनजागृती.

  5. महिला व बाल कल्याण :- महिला सक्षमीकरण, स्व-रोजगार प्रशिक्षण, बालसंवर्धन.

  6. क्रीडा, संस्कृती व युवक सक्षमीकरण :- ग्रामीण क्रीडा प्रोत्साहन, सांस्कृतिक कार्यक्रम, युवकांना करिअर मार्गदर्शन.

  7. कृषी :- नैसर्गिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन.

  8. नैसर्गिक साधनसंपत्ती व आपत्ती व्यवस्थापन :- पाणी, जंगल व जमीन संवर्धन, आपत्ती काळातील मदतकार्य.

आम्ही केलेले उपक्रम

वसुंधरा समृद्धी फाउंडेशन हे पर्यावरण रक्षण आणि सामाजिक परिवर्तन यासाठी कार्यरत असलेले एक स्वयंसेवी संस्थान आहे. आमचा विश्वास आहे की निसर्ग जपला तरच जीवन समृद्ध होईल. म्हणूनच आम्ही वृक्षारोपण, निसर्ग संवर्धन आणि हरित भारत निर्मिती  यावर भर देतो. प्रत्येक उपक्रम हा भविष्यासाठी एक हरित वारसा निर्माण करण्यासाठीच असतो.

आमच्या प्रमुख उपक्रमांमध्ये देशी झाडांची लागवड, जलसंधारण, माती संवर्धन आणि गावोगावी हरित चळवळ यांचा समावेश आहे. आम्ही शाळा, ग्रामपंचायत, स्थानिक संस्था आणि गावकरी यांना जोडून पर्यावरण जागृती अभियान राबवतो. त्यामुळे हवामान बदल थांबवण्यासाठी आणि स्वच्छ हवा निर्माण करण्यासाठी समाजाची सक्रिय भागीदारी मिळते.

आजवर हजारो झाडे लावून आम्ही अनेक गावांना हरित आणि सुंदर बनवले आहे. आमच्या उपक्रमांमुळे जैवविविधता वाढली, पाणी साठवणक्षमता सुधारली आणि स्थानिक समाजात पर्यावरणपूरक विचारांचा प्रसार झाला. आमचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक गाव हरित, निरोगी आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर पुढे जावं.

उत्तम शिंदे यांच्या हरित कार्याचा राज्यस्तरीय गौरव

वैयक्तिक वृक्ष लागवड आणि संवर्धन ह्या मधील उत्कृष्ट कार्य आणि त्या सोबतीला मुंबई पोलिस दला मध्ये 30 वर्ष निष्कलंक सेवा दिल्या बद्दल “रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली” ह्यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय “आदर्श पुरस्कार 2025” देवून मा. उत्तम परशुराम शिंदे ह्यांचा सत्कार करण्यात आला.